औरवाड / प्रतिनिधी
गुरुचरित्रातील 18 व 19 वा अध्याय, श्री अमरेश्वर, योगिनी माता या स्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र औरवाड (अमरापूर) ता.शिरोळ येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी दत्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिरामध्ये नित्य पूजा विधी, काकड आरती, महापूजा दुपारी चार वाजता श्री शिरीष जेरे पुजारी यांचे पुराण त्यानंतर श्रींचा जन्मकाळ सोळा पार पडला. दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.