प्लायवूड दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुलाची शिरोली येथील यादववाडी परिसरातील प्लायवूड दुकानाला अचानक आग लागली.या आगीत दुकानातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.पण तरुणांच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहानी टळली.हि घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, नविनकुमार राजाराम पटेल यांचा शिरोली येथे प्लायवूडच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना आहे.शनिवारी दिवसभर नेहमीप्रमाणे कारखान्यात कामगार प्लायवूड पासूनचे वस्तू तयार करण्याचे काम करत होते.शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री आठच्या वाजण्याच्या सुमारास एका खोलीत अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या शॉर्टसर्किटमुळे दुकानातील प्लायवूडला आग लागली.आग लागल्याची घटना समजताच यादववाडी भागातील नागरिकांनी महावितरण कर्मचाऱ्यांना दुर्घटनेची माहिती दिली.त्यांनी तात्काळ येऊन भागातील विद्युत पुरवठा खंडित केला.त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला.स्थानिक नागरिकांनी कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्यास व आग विझवण्यास मदत केली. त्यामुळे जीवितहानी टळली.सदर दुर्घटनेची आज दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शिरोली पोलिसात नोंद झाली नसल्याचे शिरोली पोलीसांनी सांगितले.

Spread the love
error: Content is protected !!