भरदाव चारचाकीने मोटरसायकल स्वाराला उडवले,एकाचा जागीच मृत्यू

हेरले / प्रतिनिधी

हेरले ता. हातकणंगले) येथे तवेरा चारचाकी व मोटरसायकल अपघातात मोटरसायकल स्वार हा जागीच ठार व एक जखमी झाला असून तर अपघातात नंतर तवेरा चारचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता त्याला नागरिकांनी पाठलाग करून पुलाची शिरोली येथे पकडण्यात आले आहे.हा अपघात आज रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हेरले बस स्टँड येथे घडला आहे.घटनास्थळी हातकणंगले पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हेरले येथील राजेंद्र दत्तू माने व महंमद धोंडीबा खतीब हे आपले शेतातील काम  आटोपून घरी निघाले होते.बस स्टँड फाट्याजवळ मोटरसायकल वरून रस्ता ओलांडत असताना मिरजेहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या तवेरा गाडी क्रमांक  MH 08 z 6850 या चारचाकी गाडीने पाठीमागुन मोटरसायकल क्रमांक MH 09 DN 7226 खतीब यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.या धडकेमध्ये महंमद खतीब हे मोटरसायकल वरून उडून खाली पडले व त्यांच्या अंगावरून तवेरा गेल्यामुळे ते जागीच ठार झाले.तर मोटरसायकल वरील राजेंद्र दत्तू माने हे गंभीर जखमी झाले जखमी माने यांना इचलकरंजी येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान अपघातात नंतर तवेरा चारचाकी चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता त्याला नागरिकांनी पाठलाग करून पुलाची शिरोली येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Spread the love
error: Content is protected !!