“अखेर ठरलं” मंत्री पदाचा सस्पेन्स संपला,दोन आमदारांना मंत्री पदाची संधी

कागल / प्रतिनिधी
अखेर मंत्री पदाचा सस्पेन्स संपला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे.आज नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार दुपारी होईल शपथ होईल कोल्हापूर जिल्ह्यातून आता कागल मतदारसंघाचे हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री आणि राधानगरी संघातून प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली असल्याची अधिकृत सूत्रांची माहीती असून आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांनाही शनिवारी रात्री फोन आले आपण नागपूर येथील शपथविधीला हजर रहावे, त्यानुसार त्यांचे कार्यकर्ते कुटुंबीय मोठ्या संख्येने नागपूरला रवाना झालेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार हे मंत्रीपदासाठी इच्छुक होते.आमदार राजेश क्षीरसागर,विनय कोरे,राजेंद्र पाटील-यड्रावकर,अमल महाडिक,चंद्रदीप नरके यांच्यासह हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिडकर हे दोघेही इच्छुक होते.मुश्रीफ गेले सहा वेळा निवडून आले असून वीस वर्षे मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाने संधी दिली.तर राधानगरी मतदारसंघातुन शिवसेनेच्या वतीने हॅट्रिक केलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.दुपारी दोघांचा शपथविधी होईल या दोघांनाही रात्री निरोप आले.रात्री उशिरा निरोप आले त्यांचा त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूरकडे रवाना झालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते कुटुंबीय या मंत्रीपदाच्या शपथविधीला हजर राहण्यासाठी नागपूर झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Spread the love
error: Content is protected !!