केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कवठेगुलंदचे उज्वल यश,केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा यशस्वी

दत्तवाड / प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक शेडशाळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद(गाव) शाळेने सांघिक व वैयक्तिक गटात उज्वल यश प्राप्त केले.
सांघिक मोठा गट मुलांच्या संघाने खो खो व रिले मध्ये प्रथम,कबड्डीत द्वितीय तर लहान गट मुलांचे संघाने कबड्डीत प्रथम क्रमांक पटकावला.मुलींच्या थाळीफेक मोठा गटात कु.निकिता मनोहर हेगाण्णा हिने प्रथम तर कु.सिद्धी नितीन शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मोठा गट मुलांमध्ये सोहम सुशीलकुमार पडसलगे याने लांब उडीत प्रथम तर उंच उडीत द्वितीय क्रमांक मिळविला.फैयाज जावेद पकाली याने मोठा गटात४०० मी.धावणेत प्रथम, गोळाफेक प्रकारात द्वितीय,४० किग्रॅ वजनी गट कुस्तीत द्वितीय क्रमांक पटकावला.१०० मीटर धावणेत अनिस यासीन मलंगफकीर द्वितीय,२०० मी. धावणेत अनिकेत जयकांत पाटील द्वितीय तर६०० मी. धावणेत आर्यन गणेश कागले द्वितीय आला.लहान गट मुलांमध्ये सिद्धार्थ नामदेव माळी याने उंच उडी व ५० मी. धावणेत प्रथम तर केदार अमोल महाडीक तिसरा आला.१०० मी. धावणेत अर्णव आप्पासाहेब सुतार प्रथम आला.लहान गट मुलींच्यात लांब उडीत कु.सायमा यासीन कनवाडे तृतीय आली. कु.सुहाना इस्माईल वाळवेकर १०० मी. धावणेत प्रथम तर उंच उडीत द्वितीय आली.१००मी.धावणेत कु.दुर्वा किरण जगताप द्वितीय आली.यशस्वी स्पर्धकांना प्रभारी मुख्याध्यापक दिपक कदम,चंद्रकांत नवटे,मुकुंद कुंभार,अरुण कांबळे, सविता उपाध्ये,वैशाली आवटी, शिलप्रभा माळी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी संयोजन करुनही इतके उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिक्षक स्टाफचा सत्कार करण्यात आला.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, क्रीडा विभागप्रमुखएन.व्ही.पाटील,केंद्रप्रमुख संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले तर शेडशाळ केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक,ग्रामपंचायत कवठेगुलंद,शाळा व्यवस्थापन समिती,देणगीदार,ग्रामस्थ व युवक मंडळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!