दिव्यांगांना निसर्गाने दिव्य शक्ती दिली – अति.सीईओ संतोष जोशी

दत्तवाड / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा शाखा कोल्हापूर यांचे वतीने शुक्रवार दि.१३ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल साईक्स एक्सटेंशन शाहुपूरी कोल्हापूर येथे अपंग कायदा २०१६ कार्यशाळा संपन्न झाली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश आंग्रे यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर कांबळे होते.अपंग कायदा २०१६ या विषयी मार्गदर्शन झाले.कार्यक्रमात सेवानिवृत्त,गुणवंत दिव्यांग कर्मचारी,दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.दुपारच्या सत्रात दिव्यांगांची मंजूर असलेल्या राजर्षि पतसंस्था कार्यान्वित करण्यासाठी संगोपांग चर्चा करण्यात आली.सदर कार्यशाळेसाठी कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेएन,प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शुभेच्छा संदेश पाठविले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सौ.स्वाती दुधाने हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.प्रमुख पाहुणे संतोष जोशी यावेळी बोलताना म्हणाले की दिव्यांग कर्मचारी दिव्यांग नसून त्यांच्याकडे दिव्य अंग शक्ती असल्याचे सांगून जिल्हा परिषदेकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच बैठक लावण्यात येईल. दिव्यांग भवन उभारण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्याच्या सूचना केल्या.तर कोल्हापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे म्हणाल्या की कोल्हापूर शहरातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या व बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असून शहरातील दिव्यांग भवन पूर्ततेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू -रोहित गाडवे,प्रभाकर पाटील,सौ.सुप्रिया तावडे,कु.दिपाली मुगळे,कमलेश कराळे, पै.शुभम पाटील यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
दिव्यांग सन्मित्र पुरस्कार राजेंद्र आपुगडे,अजित शिंदे,सौ.संगिता राणे यांना देण्यात आला.उत्कृष्ट दिव्यांगरत्न पुरस्कार धिरज चव्हाण,कृष्णात पाटील यांना देण्यात आला.प्रा.बाजीराव वारंग,डॉ.युवराज मिठारी, राजेंद्र लवटे यांना दिव्यांग उच्च विद्याविभूषित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ठ संघटक म्हणून संजयसिंह जाधव,संजय जितकर,मेहबूब मुजावर,निवास जाधव,आदर्श शिक्षक अनिल चौगुले यांना सन्मानित करण्यात आले.सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आंग्रे,कार्याध्यक्ष अतुल धनवडे,उपाध्यक्ष शशिकांत कांबळे,अनिल चौगुले,किशोर तावडे,अजय पोवार,रावसाहेब पाटील,उध्दव पन्हाळकर,चंद्रकांत म्हेतर यांचेसह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले.दिव्यांग बंधू -भगिनी,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सर्व सभासद बंधू भगिनींनी कार्यशाळेस उपस्थित होते.सूत्रसंचलन सौ.शबनम जमादार यांनी तर आभार सुनिल खांडेकर यांनी मानले.

Spread the love
error: Content is protected !!