“धाडसी घरफोडी” ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने केला लंपास

यड्राव / प्रतिनिधी

यड्राव येथील इकबाल आलासे राहणार रेणुका नगर यड्राव यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोतून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदी व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.आज शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यड्राव येथे इकबाल आलासे हे आपल्या परिवारासह राहतात काही कामानिमित्त ते परिवारासह बाहेरगावी गेले होते.याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कधी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील तिजोरीची तोडफोड करून तिजोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमअज्ञात चोरट्याने लंपास केला.यामध्ये गळ्यातील नेकलेस अंगठ्या चेन पैंजण असा सुमारे ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसताच काही नागरिकांनी आलासे यांना संपर्क करून याची माहिती दिली त्यांनी घरात आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे निष्पन्न झाले याची माहिती त्यांनी शहापूर पोलिसांना दिली.शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.पंचनामा केला तसेच श्वानपथकाला पाचारण केले तर श्वान त्याच ठिकाणी घुटमळले व तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.सध्या इचलकरंजी शहर परिसरामध्ये घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.घरात कोण नसल्याचे पाहून कुलूप असल्याचे बघून अज्ञात चोरटे बंद घर फोडून त्यातील ऐवजी लंपास करत आहेत.तसेच नागरिकांनी आपले मौल्यवान वस्तू चांगल्या ठिकाणी ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.घरामध्ये सीसीटीव्ही लावावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Spread the love
error: Content is protected !!