कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथे गुरूवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दोन कुटुंबीतील झालेल्या वादातून तलवार हल्ल्यातील सहा आरोपीना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कुरुंदवाड पोलीस ठाणे यांच्याकडे परस्पर विरोधी दाखल झालेल्या तलवार हल्ल्यातील 15 आरोपीपैकी 6 आरोपीना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती.त्यामुळे त्यांना आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पुन्हा न्यायालयात हजर केले असता,कुबेर नाईक, सुधीर नाईक,अण्णासो नाईक,श्रीकांत नाईक, श्रीराम नाईक,अमरसिंह नाईक या सहा आरोपीना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला असल्याची माहिती पोलिसातून मिळाली. आरोपीचावतीने अँड अमर बुबनाळे यांनी काम पहिले तर गुन्ह्याचा तपास श्री चव्हाण हे करत आहेत.