शिरोळ /प्रतिनिधी
श्री दत्तात्रयांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्तजयंती निमित्त शुक्रवारी रात्री श्री दत्त दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शिरोळमधील अनेक सामाजिक संस्था व तरुण मंडळाच्या वतीने मोफत अल्पोपहार चहा व दुधाचे वाटप करण्यात आले. शहरातील अनेक चौका चौकात अल्पोपहार चहा व दूध वाटपाचे स्टॉल मांडण्यात आले होते.येथील के पी टी चौकापासून नृसिंहवाडी रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरापर्यंत ठीक ठिकाणी दत्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता मोफत अल्पोपहार चहा व दूध वाटप करण्यात आले शिरोळकरांनी केलेल्या या नियोजनामुळे भाविकांनीही समाधान व्यक्त केले.
नृसिंहवाडी रस्त्यावरील शेतकरी वजन काटा येथे रोटरी क्लब ऑफ शिरोळच्यावतीने दूध वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लब शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी सचिव डॉ. अंगराज माने, खजिनदार दिनेश माने गावडे, सदस्य युवराज जाधव विजय चव्हाण मनोज शिंदे शिवराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
राजा शिवछत्रपती तरुण मंडळ भाट गल्ली, जय हिंद मंडळ काळे गल्ली यांच्या वतीने पोहे व चहाचे वाटप करण्यात आले यावेळी चंद्रकांत भाट, विराजसिंह यादव, लालासाहेब गावडे, संदीप गावडे, अंकुश काळे सुभाष भाट दीपक भाट प्रशांत माने चुडमुंगे दत्तात्रय काळे सिद्धेश भाट सौरभ काळे जयदीप काळे मुर्गेंद्र यादव पारस भाट संकेत बाबर निरंजन यादव प्रसाद यादव विनायक काळे विनायक बाबर दरगू गावडे रवींद्र काळे सागर भाट तानाजी काळे विशाल काळे केतन चव्हाण संकेत कोळी यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शिरोळातील अनेक तरुण मंडळांच्यावतीने श्री दत्त भाविकांसाठी अल्पोपहार व चहा दूध वाटप करण्यात आला प्रत्येक वर्षी श्री दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडीला श्री दत्त दर्शनासाठी शिरोळमधून पायी जाणाऱ्या दत्त भक्तांना मोफत पोहे, शिरा, उपीट, इडली सांबर, वडापाव, असा अल्पोपहार चहा व दूध दिले जात आहे.