आमदार साहेब कोट्यवधींचा निधी एका पावसात धुऊन जाईल – आंदोलन अंकुश

नांदणी /प्रतिनिधी

 

शिरोळ नांदणी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम करत आहे.नांदणी गावात काम सुरु असताना त्या ठिकाणी डांबर मारून त्यावर माती टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरु आहे.कोणत्याही तांत्रिक बाबी न पाळता,अधिकारी उपस्थित नसताना अगदी निकृष्ट काम करायला सुरुवात झाली असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता नांदणी येथे केला. यावेळी कोट्यावधी रुपयांचे काम ठेकेदार करत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करून कामाच्या दर्जा बाबत प्रश्न उपस्थित केले आणि थांबून झालेले काम पुन्हा काढून नव्याने करायला लावले. राज्याच्या बजेट मधून हे काम होत असले तरी जनतेच्या करातून हे पैसे आलेले आहेत.अशा प्रकारे कामं केली तर ती एका पावसात कोट्यवधींचा रस्त्याच्या निधी धुऊन जाईल म्हणून संबधीत अधिकाऱ्यांनी कामावर जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच विकासाच्या नावावर मतं मागितलेल्या आमदार साहेबांनी पण कामं क्वालिटीची होतात की नाही यावर नजर ठेवावी अशी करदात्या नागरिकांची अपेक्षा असल्याचे ही धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केले.

Spread the love
error: Content is protected !!