केंद्रस्तरिय स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शाळेने गाजवले मैदान

शिरोळ / प्रतिनिधी

येथील दत्तनगर येथे झालेल्या केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर या शाळेने घवघवीत यश संपादन करून केंद्रीय जनरल चॉम्पियनशीपवर आपले नाव कोरले आहे.या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या क्रीडा स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगरने खो खो लहान गट प्रथम,खो खो मोठा गट व्दितीय,कब्बडी लहान गट प्रथम,कब्बडी मोठा गट व्दितीय,५० मीटर धावणे लहान गट- प्रथम वरदान दिगंबर चुडमुंगे,१०० मीटर धावणे लहान गट प्रथम वरदान दिगंबर चुडमुंगे, १०० मीटर धावणे मोठा गट प्रथम आश्रय अविनाश कांबळे, २०० मीटर धावणे मोठा गट- द्वितीय आश्रय अविनाश कांबळे,४०० मीटर मोठा गट तृतीय प्रेम गुलशन शर्मा- ६०० मीटर मोठा गट- तृतीय प्रेम गुलशन शर्मा,लांब उडी- लहान गट प्रथम वरदान दिगंबर चुडमुंगे,लांब उडी मोठा गट प्रथम आश्रय अविनाश कांबळे,उंच उडी- लहान गट प्रथम क्रमांक वरदान दिगंबर चुडमुंगे,उंच उडी- मोठा गट प्रथम आश्रय अविनाश कांबळे,गोळा फेक- मोठा गट द्वितीय संग्राम प्रभू मिरजकर,थाळी फेक- मोठा गट द्वितीय आश्रय अविनाश कांबळे,कुस्ती- २५ किलो गट प्रथम जयदीप मच्छिंद्र शिंदे,कुस्ती- ३५ किलो गट प्रथम आरव मोहन इंगवले,कुस्ती -४० किलो गट व्दितीय शुभम अनिल शर्मा, कुस्ती -४५ किलो गट प्रथम शौर्य शंकर धनगर, रीले- ४*१०० प्रथम मोठा गट. अशी तब्बल २१ बक्षिसे मिळवून शाळेचा नावलौकिक केला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके, शिक्षक अनुराधा शिनगारे, रेहानाकोठावळे, महेश कांबळे , विद्या पाटील , युवराज पाटील,प्रितम गवंडी यांचे मार्गदर्शन मिळाले. तर गटशिक्षणाधिकारी भारती कोळी , शिक्षण विस्तार अधिकारी डी.एल.कामत , केंद्रप्रमुख आण्णा मुंडे तसेच अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांची प्रेरणा मिळाली.

Spread the love
error: Content is protected !!