कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून महिलेचा जागीच मृत्यू

इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून झालेल्या अपघातात सौ.शालन मारुती पवार वय 62 रा.बाळनगर या वृध्देचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरात इस्माईल खानापुरे यांचा यंत्रमाग कारखाना आहे.तर पोटमाळ्यावर कांडीमशिन आले.याठिकाणी सौ.शालन पवार या कांडी मशिनवर काम करीत होत्या.शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे सौ.शालन या कामावर आल्या होत्या. थंडीपासून बचावसाठी त्यांनी स्कार्फ बांधला होता.काम करत असताना त्यांचा हा स्कार्फ कांडी मशिनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्फचा गळफास लागून सौ.पवार यांचा जागीच मृत्यू झाला.काही वेळानंतर यंत्रमाग कारखान्यातील कामगार पोटमाळ्यावरील कांडी मशिनच्या ठिकाणी गेले असता सौ.पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. तातडीन सौ.पवार यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोहेकॉ रजनीकांत कांबळे करत आहेत.
Spread the love
error: Content is protected !!