शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री दत्तगुरु भोजन पात्र मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी बारा वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे.या निमित्य महाप्रसाद समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री दत्तगुरु भोजन पात्र मंदिरात गेले सात दिवस झाले नामांकित व्यक्तींचे भजन,कीर्तन,प्रवचन यास अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू असून भोजनपात्र मंदिरात पहाटे अभिषेक,महापूजा, धुपारती, नित्य पालखी सोहळा केला जात आहे.शिरोळ येथे श्री दत्तगुरु महाराज भोजन केल्याची आख्यायिका आहे.देशांमध्ये अन्य ठिकाणी महाराजांची पाद्यपूजा केली जाते श्री दत्तगुरु महाराज यांनी भोजन केल्याने या ठिकाणी हाताचे ठसे आहेत. आजही श्रींची हस्तपूजा नित्यनेमाने केली जाते. श्रींच्या उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून भव्य दिव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच भव्य मंडप उभारण्यात आला आहे.मंदिराचे पुजारी प्रसाद कुलकर्णी,अजित कुलकर्णी,दीपक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कुलकर्णी बांधवांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.श्री दत्त गुरु भोजन पात्र मंदिरात श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे वाटप केले जाते.रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता ‘श्री’चा जन्म झाल्यानंतर महाप्रसाद समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.याचा लाभ भाविकांना घेण्याचे आवाहन महाप्रसाद समितीच्या वतीने करण्यात आले आहे.