शेडशाळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथे दोन कुटुंबांतील वादातून तलवारीसारख्या प्राणघातक हत्यारांचा वापर करून सहा जणांवर हल्ला करण्यात आला आहे.या हल्ल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.नाईक गल्लीत दोन कुटुंबांतील व्यक्तींमध्ये झालेल्या या वादामुळे एकमेकांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात राजेंद्र गोकुळ नाईक,महादेव गामा नाईक,कुबेर आण्णासो नाईक,सुधीर आण्णासो नाईक, आण्णासो बाळु नाईक आणि श्रीकांत आण्णासो नाईक (सर्व रा.शेडशाळ) हे सहा जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी दोन्ही गटांतील आरोपींना अटक केली आहे.कुबेर आण्णासो नाईक,सुधीर आण्णासो नाईक,आण्णासो बाळु नाईक,श्रीकांती आण्णासो नाईक,श्रीराम गोपाळ नाईक, अमरसिंह गोपाळ नाईक सर्व रा. माळभाग,शेडशाळ यांना अटक करून आज दुपारी 4 वाजता येथील न्यायालयात उभे केले असता 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर दुसऱ्या गटातील विजय पापा नाईक,महादेव गणु नाईक,महेश महादेव नाईक, अमित तानाजी नाईक,संजय सिद्राम नाईक,सुरेश अशोक नाईक,अजित श्रीपती नाईक सर्व रा.गावभाग, शेडशाळ यांना अटक करून उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसातून देण्यात आली.