शिरोळ तालुक्याची शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

दत्तवाड / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषदांच्या शाळांत गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.त्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद व मिळणारी फलनिष्पत्ती चांगली आहे. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर यांनी काढले.काल गुरुवारी शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देवून शैक्षणिक कामकाजाची पाहणी करुन शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अधिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत अधिकाधिक विद्यार्थी यावेत यासाठी शिक्षकांच्याकडून चांगल्या कामगिरीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी शिक्षणाधिकारी सौ.शेंडकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय मॉडेल स्कूल शिवनाकवाडी शाळेच्या वार्षिक तपासणी करुन समाधान व्यक्त केले. तर विद्या मंदिर नृसिंहवाडी या शाळेचे कामकाज पाहून मौलिक सूचना केल्या.याप्रसंगी शिरोळ तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,एन.व्ही.पाटील,एन.जे.पाटील, केंद्रप्रमुख अशोक भुजवडकर,संजय निकम,दत्तात्रय जाधवर,सलीम अत्तार,शिवाजी भोसले,सुभाष कुरुंदवाडे,हिंदूराव फासके, रा.बा.कोळी,शितलनाथ खोत,प्रकाश खोत,देवमोरे, मुख्याध्यापक तुकाराम राजुगडे उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!