नृसिंहवाडी / प्रतिनिधी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडी इथे 14 डिसेंबर शनिवारी दत्त जयंती सोहळा मोठया उत्साहात साजरा होत असून.या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत, पोलीस,प्रशासनाने जय्यत तयारी केलीय.दत्त देवस्थानकडून श्रींचे दत्त दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी तीन ठिकाणी दर्शन व्यवस्था केली आहे.दर्शन काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. भाविकांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला कापडी मंडप उभारलेत तसेच मंदिर समोर पोर्च वाढविला असल्याने भाविकांची सोय झाली आहे.ठिकठिकाणी भाविक मंदिरात येऊन बाहेर जाण्यासाठी मार्ग वणवे केल्याने गर्दीवर नियंत्रित होणार आहे.तर महाप्रसादचे आयोजन तसेच दत्त जयंती दिनी श्रींचे नित्य कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव संजय पुजारी यांनी आज शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिली.दरम्यान ग्रामपंचायत वतीने ही गावात स्वच्छता तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नृसिंहवाडी सरपंच चित्रा सुतार,सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी दिले यांनी दिले.दरम्यान दत्त जयंतीमुळे बाजारपेठ भाविकांच्या प्रतिक्षेत सज्ज आहेत तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर व गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.दत्त जयंती बाबत प्रशासनाच्यावतीने शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर अप्पर पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवी यांनी ही ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेऊन दत्तजयंती दिवशी शनिवारी शिरोळ – कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.