बांबवडेचा उदय साखर कारखाना देणार ३२००/ पहिली उचल

शाहूवाडी / प्रतिनिधी

अथणी शुगर युनिट २ च्या बांबवडे येथील उदय साखर कारखान्याने गत हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये प्रमाणे ऊसदर त्वरित जाहीर करावा,अन्यथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर बेमुदत वजनकाटा बंद आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला होता.त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करीत चालू हंगामासाठी प्रतिटन ३ हजार २०० ऊसदराची घोषणा प्रसिद्धपत्रद्वारे केली.गेल्या वर्षीच्या ऊसाला १०० रुपये देण्याचे आश्वासनही दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी सांगितले.बांबवडे-सोनवडे युनिट २ चे व्यवस्थापक इस्माईल मुलाणी यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ठरलेल्या ऊसदराच्या तोडग्याची आठवण करून देत त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली.यावेळी कारखाना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी संचालक योगेश पाटील यांनीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान राखत यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३२००/ रूपये ऊसदर देण्याची तयारीचे पत्र स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाला दिले. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल स्वाभिमानीने कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर,भैय्या थोरात,जयसिंग पाटील,अजित साळुंखे,राम लाडयांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!