कौटुंबिक वादातून प्राणघातक हत्यारांने ६ जणांवर हल्ला,१५ जणांवर गुन्हा दाखल

कुरुंदवाड / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथे दोन कुटुंबीतील वाद विकोपाला गेल्याने तलवारीसारख्या प्राणघातक हत्यारांचा वापर करून सहा जणांवर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यातील जखमींवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी दुपारी किरकोळ कारणावरून झालेला वाद रात्री साडेनऊ वाजता हल्ल्यात बदलला.रात्री साडेनऊ वाजता नाईक गल्लीत दोन कुटुंबात एकमेकांत जुंपली दोन्ही कुटुंबातील आरोपींकडून एकमेकांवर तलवार हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या हल्ल्यात राजेंद्र गोकुळ नाईक, महादेव गामा नाईक, कुबेर आण्णासो नाईक, सुधीर आण्णासो नाईक, आण्णासो बाळु नाईक आणि श्रीकांत आण्णासो नाईक(सर्व.रा शेडशाळ) हे सहा जण जखमी झाले.दोन्ही गटांनी पोलीसात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून राजेंद्र नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दुपारी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले असता संशयित आरोपी कुबेर आणासो नाईक, सुधीर आणासो नाईक,आण्णासो बाळु नाईक,श्रीकांती आण्णासो नाईक, श्रीराम गोपाळ नाईक, अमरसिंह गोपाळ नाईक (सर्व रा. माळभाग शेडशाळ ता. शिरोळ )यांनी तुम्ही आंम्हाला कोण विचारणार असे सांगत शिवीगाळ करून हातातील तलवारीने राजेंद्र नाईक यांच्यावर हल्ला चढवला. सोडवण्यासाठी भाचा महादेव गामा नाईक हा मधे आला असता त्याच्यावरही हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे.
तर कुबेर नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सायंकाळी चार वाजता झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संशयित आरोपी राजेद्र गोकुळ नाईक,विजय पापा नाईक,महादेव गामा नाइक,महादेव गणु नाईक,महेश महादेव नाईक,अमित तानाजी नाईक संजय सिद्राम नाईक,सुरेश अशोक नाईक,अजित श्रीपती नाईक (सर्व रा.गावभाग शेडशाळ) फिर्यादी कुबेर नाईक यांच्या घरासमोर येऊन कुबेर नाईक यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला तर भांडणे सोडविण्यासाठी त्याचा भाऊ सुधीर नाईक व त्याचे आई-वडील हे सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

Spread the love
error: Content is protected !!