धामोडकरांचा असाही प्रामाणिकपणा,तीन तोळ्याचे ब्रेसलेट परत,राधानगरी पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार

कुंभोज / प्रतिनिधी

सरवडे ता,राधानगरी येथील युवराज एकल हे राधानगरी तहसीलदार कार्यालयात अनेक वर्ष स्टॅम्प व्हेंडरचे काम करतात, नेहमीप्रमाणे सकाळी काम करत असताना त्यांच्या हातात असलेले तीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट नकळतपणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पडले, ब्रेसलेट पडल्याचे थोड्यावेळात लक्षात आल्यानंतर त्यांनी ठीक ठिकाणी चौकशी व शोधाशोध चालू केली,मात्र या ठिकाणी धामोड तालुका राधानगरी येथील राजन अण्णा तेली,किरण ईश्वरा रायकर व ओंकार राजाराम तेली सर्वजण रा,धामोड हे आपल्या कामानिमित्त तहसीलदार आले होते, या तिघांना अंदाजे सुमारे दोन लाख 70 हजार किमतीचे हे ब्रेसलेट सापडले, ब्रेसलेट हरवल्याचे काही जणांनी स्टेटस ठेवले ग्रुपला सगळीकडे व्हायरल केले,
या स्टेटसची दखल घेऊन व प्रामाणिकपणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धामोडकरांनी युवराज एकल यांना फोन करून ब्रेसलेट मिळाल्याची माहिती दिली, चौकशी व माहिती घेऊन त्यांना हे ब्रेसलेट परत केले या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे, त्यांनी याबद्दल बक्षीस देण्याचें ठरविले मात्र त्यांनी ते नाकारले, या बद्दल तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे, राधानगरी पोलीस ठाण्याच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांच्यासह सुनील चौगुले सातापा बोडके, दिग्विजय पाटील,उत्तम बोडके व त्यांचे मित्र उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!