कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी लागतील प्रयत्न करू-आ.अमल महाडिक

कुंभोज / प्रतिनिधी 

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पु. येथे 100 दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ व बडका तपासणी आधुनिक सबरेण मशिनचे उदघाटन माननीय आमदार श्री अमल महाडिक साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे अध्यक्षस्थानी होत्या. आमदार अमल महाडिक साहेब यांचा सरकार डॉ. अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे यांचा सत्कार डॉ. उत्तम मदने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमल साहेब यांच्या शुभहस्ते रुग्णांना किट वाटप करण्यात आले. सरपंच मॅडम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्वे करताना अंगणवाडी सेविका व आशा सेविका या प्रामाणिकपणे काम करतात त्यांना काही घरात माहिती देत नाहीत तरीपण त्या सर्वे पुर्ण करतात त्यांच्यामुळे आपल्याला प्रत्येक रोगावर मात करता येते क्षयरोग सर्वे साठी कोणतेही मदत लागलेस ग्रामपंचायत मार्फत करणेत येईल यावेळी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिपंळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, डॉ. सुधाकर जोशी एस. टि एस. यु. टिम हेड पुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँडरुज व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पु ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम मा.उपसरपंच कृष्णात करपे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामपंचायत प्रतिनिधी संजय पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!