शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १०० दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे १०० दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ व बडका तपासणी आधुनिक सब्रेन मशीनचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांचा हस्ते करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे,डॉ.अनिरुद्ध पिंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.उपयुक्त सरपंच पद्मजा करपे यांचा सत्कार डॉक्टर उत्तम मदने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते रुग्णांना किट वाटप करण्यात आले. लोकनियुक्त सौ.सरपंच पद्मजा करपे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आपल्या गावामध्ये सर्वे करताना अंगणवाडी सेविका व आशा सेविका या प्रामाणिकपणे काम करतात त्यांना काही घरात माहिती देत नाहीत तरीपण त्या सर्व पूर्ण करतात त्यांच्यामुळे आपल्याला प्रत्येक रोगावर मात करता येते क्षयरोग सर्वेसाठी कोणतीही मदत लागलीस ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल असे सौ करपे यांनी आश्वासन दिले.या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले ऐकाद्या रूग्णाची आजाराबाबत मानसिकता बदलते तेव्हा तो मनाने हारला तरच तो हारतो नाही तर तो प्रत्येक गोष्टीत पुढे असतो त्यासाठी त्या रूग्णास योग्य सल्ल्या बरोबर उपचारही आवश्यक असतो असे मत आमदार अमल महाडिक यानी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग निर्मुलन मोहिम व क्षयरोग तपासणी मशिनच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे होत्या तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक,डॉ.सुधाकर जोशी एस.टि.एस.यु. टिम हेड पूणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार होते.पुढे बोलताना महाडिक म्हणाले कि प्रशासन काम करत असताना लोक प्रतिनिधींनी जनतेचा सेवक म्हणून काम करणे महत्वाचे आहे यासाठी येणाऱ्या १०० दिवसात जिल्ह्यातील जिल्हा परिषद दल हा टि बी मुक्त करण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य केले पाहीजे असे ते म्हणाले यावेळी सुधाकर जोशी एस.टि.एस.यु. टिम हेड पूणे बोलताना म्हणाले कि  कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक घरघर फिरून कोणास क्षयरोग आहे का याची खातरजमा करून क्षयरोगाबाबत रुग्णासोबत प्रबोधन करणे उपचारासाठी पीएसीपर्यंत आणणे तसेच तो रुग्ण वेळेवर औषध घेतोय की नाही याची पाहणी करणे तसेच रुग्णांनी ही स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आज शासकीय रुग्णालय मध्ये जी औषध मिळतात ती औषधे कोठेही मिळत नाहीत जरी खाजगी मध्ये रुग्ण गेला तरी डॉक्टरांनी लिहिले तेवढी तो रुग्ण औषध घेत नाही तो त्याला परवडेल अशाच किमतीची औषधे घेतो ते देखील निम्मीच खातो पूर्ण बरा होत नाही तर सर्व रुग्णांनी ही काळजीपूर्वक पी एस सी मध्ये येऊन नियमित उपचार घेणे गरजेचे आहे सर्व औषधे मोफत आहेत याचा सर्वतोपरी लाभ घ्यावा व आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव क्षयमुक्त करावे असे आव्हान केले.यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्ड्रयुज शिरोली पु. खाजगी डॉक्टर असोसिअशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, डॉ. योगेश खवरे, डॉ. मनियार माजी उपसरपंच कृष्णात करपे , उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिपंळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, डॉ. सुधाकर जोशी एस. टि एस. यु. टिम हेड पुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँडरुज व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पु ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम मा.उपसरपंच कृष्णात करपे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामपंचायत प्रतिनिधी संजय पाटील आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
Spread the love
error: Content is protected !!