जागतिक अपंग दिनाचे औचित्य,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा होणार गौरव
दत्तवाड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा शाखा कोल्हापूर यांचे वतीने शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल साईक्स एक्सटेंशन शाहुपूरी कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता अपंग कायदा २०१६ मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित केली आहे.त्याचबरोबर सेवानिवृत्त, गुणवंत दिव्यांगकर्मचारी,दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा व मान्यवरांचे मार्गदर्शन असा संयुक्त सोहळा संपन्न होणार आहे.सदर कार्यशाळेसाठी कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेएन,प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सौ.स्वाती दुधाने,निवडणूक तहसिलदार महेश खिलारी हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आंग्रे,कार्याध्यक्ष अतुल धनवडे,उपाध्यक्ष शशिकांत कांबळे,अनिल चौगुले किशोर तावडे सचिव तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी , तालुका अध्यक्ष व सचिव हे कष्ट घेत आहेत.सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी एक दिवसाची विशेष रजा मंजूर केली आहे.तरी दिव्यांग बंधू -भगिनी, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे सर्व सभासद बंधू भगिनींनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिरोळ तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस मेहबूब मुजावर यांनी केले आहे.