दत्तवाड केंद्रांतर्गत स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
दत्तवाड / प्रतिनिधी
शासकीय नोकरीमध्ये क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूना चांगली संधी आहे.त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची चांगली तयारी करुन घ्यावी असे आवाहन नवे दानवाड चे सरपंच सी.डी.पाटील यांनी केले. दत्तवाड केंद्रांतर्गत स्पर्धेचे ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.दत्तवाड केंद्रांतर्गत अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा नवे दानवाड येथे उत्साहात सुरुवात झाली.स्वागत मुख्याध्यापक मारूती कोळी यांनी तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख संजय निकम यांनी केले.ध्वजारोहण सरपंच सी.डी. पाटील तर मशाल पूजन माजी सरपंच बाबासो पाटील यांचे हस्ते झाले.क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून पवन मोहिते,गिरीश मोहिते,संजय निर्मळ, बाळू कमलाकर यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा संयोजनासाठी दिपक पाटील, भालचंद्र खोत,शंकर पाटील,काका पुजारी,काशीनाथ मोडके यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी केंद्र प्रमुख संजय निकम, उपसरपंच प्रशांत कांबळे,संजय धनगर,पोलिस पाटील स्वाती कुन्नुरे,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, केंद्रशाळा मुख्याध्यापक कुमार सिदनाळे, आश्रमशाळा चेअरमन संजय नाईक,आश्रमशाळा मुख्याध्यापक ए.पी.पाटील,सुभाष नलवडे,दत्तात्रय कमते,सुभाष तराळ,रमेश कोळी,शिवाजी ठोंबरे,दिलीप शिरढोणे, अशोक कोळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत बेरड,शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक- शिक्षक,पत्रकार,ग्रामस्थ उपस्थित होते.आभार पुष्पा बाबर यांनी केले.