तुम्ही कधी पालीचे मंदिर बघितले आहे का? तमिळनाडूच्या काजीपुरम मध्ये वरदराज पेरू माल म्हणून भगवान विष्णूचे एक मंदिर आहे.या मंदिरामध्ये गोल्डन लिझर्ड म्हणून एका पालीची मूर्ती आहे या पालीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक देशभरातून येतात.व देवी देवतांबरोबर या पालीची पूजा देखील या मंदिरात केली जाते. भागवत पुरानामध्ये दिलेल्या एका कथेनुसार एकदा यादव कुटुंब खेळत असताना त्यांना एका विहिरीमध्ये एक खूप मोठी पाल सापडली, या पालीला बाहेर काढण्यासाठी ते श्रीकृष्णाला बोलवतात श्रीकृष्णाच्या हाताचा स्पर्श होताच त्या पालीचे रूपांतर एका ‘राजा’मध्ये होते.या राजाला एका ब्राह्मणाने श्राप देऊन त्याचे रूपांतर एका पालीमध्ये केले होते. श्रीकृष्णाच्या हाताचा स्पर्श झाल्यामुळे तो राजा आता श्रापामधून मुक्त झाला होता भारतामध्ये अशा मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये तुम्हाला पालींच्या मुर्त्या सापडतील पाल ही माता लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे तिची पूजा देखील या मंदिरामध्ये केली जाते.
Recent Posts
