म्हणून कावळा एक डोळ्याने बघू शकत नाही ?

कावळा एक डोळ्याने बघू शकत नाही ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? या कावळ्याच्या डोळ्यावर भगवान श्रीरामाने ब्रह्मास्त्र सोडला होता.एक वेळी ची गोष्ट आहे.जेव्हा भगवान श्रीराम निद्रावस्थेमध्ये होते.तेव्हा सीतामाता त्यांच्या बाजूला बसली होती.त्यावेळी एक कावळा आला आणि सीता मातेला त्रास देऊ लागला. त्यांने सीता मातेला एक चोच मारली चोच मारल्यामुळे सितामातेच्या शरीरातून एक रक्तचा थेंब निघाला आणि तो भगवान श्रीरामाच्या अंगावर पडला. भगवान श्री राम निद्रावस्थेतून जागे झाले.त्या कावळ्याचा त्यांना खूप जास्त राग आला म्हणून त्यांनी त्या कावळ्यावर एक ब्रह्मास्त्र सोडला नंतर भगवान श्रीरामांना कळाला तो इंद्रदेव चा मुलगा जयंत आहे.ब्रह्मस्त्रला कधीच कोणी थांबू शकत नाही त्यामुळे जयंत ने जाऊन भगवान श्रीरामाची माफी मागितली.पण प्रभू श्रीरामानी त्याला असं सांगितलं की हा ब्रह्मास्त्र कोणीही थांबू शकणार नाही म्हणून तो ब्रह्मास्त्र श्रीरामाने कावळ्याच्या एका डोळ्यावर मारला आणि त्याचा एक डोळा गेला पण प्रभू श्री रामचंद्र ने त्याला एक आशीर्वाद दिला, की भले तू एका डोळ्याने बघू शकत नाही पण तुझ्याकडे जो एक डोळा आहे. त्याने तो ते सगळं काही पाहू शकतोस जी मनुष्य देखील पाहू शकत नाही तू कुठल्याही प्रेत व आत्म्याला तू तुझ्या एका डोळ्याने पाहू शकतो.
Spread the love
error: Content is protected !!