कोल्हापूर / प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील दोन ग्रामपंचायत अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले.ग्रामविकास अधिकारी सचिन बाळकृष्ण मोरे आणि प्रथमेश रविंद्र डंबे यांना ५००० रुपये लाच स्वीकारताना अँटी करप्शन पथकाने अटक केली.या प्रकरणी शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास सुरू आहे.तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या मृत्यूचा दाखला आणि सासऱ्यांच्या बांबवडे येथील घराच्या घरटन उताऱ्याच्या कामासाठी ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांनी २०,००० रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तडजोडीअंती ५००० रुपये स्वीकारण्याचे ठरवले.दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून ही लाच रक्कम स्वीकारली आणि त्यानंतर अँटी करप्शन पथकाने छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडले.सापळा ११ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील अँटी करप्शन पथकाने रचला होता.लाच लुचपत प्रतिबंध पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला,पोलीस हवालदार अजय चव्हाण,पोलीस नायक सुधीर पाटील,पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील,सहायक फौजदार कुराडे यांनी सहभाग घेतला.ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे हे परखंदळे आणि बांबवडे येथील ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तर प्रथमेश डंबे हे साळशी पिशवी ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत.या दोघांनी लाच मागणी केली होती आणि तडजोडीअंती ५००० रुपये स्वीकारले.शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिकारी यांनी सांगितले की,आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध लाचखोरीची कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सरकारी यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे.लाचखोरीच्या अशा घटनांमुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपास सुरु आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपींच्या कागदपत्रांचा तपास करून लाचखोरीसाठी केलेल्या मागणीचा विस्तृत तपास केला जाईल.यामुळे शासनाच्या वतीने अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ कोल्हापूर लाच लुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
वैष्णवी पाटील
(पोलीस उप अधीक्षक
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर )
मो.नं. 9764140777
(कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989) कार्यालय मेल आयडी(dyspackolapur@gmail.com) यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
*@ टोल फ्रि क्रं. 1064*(आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.)