जयसिंगपुरातील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद. १२३ जणांनी केले रक्तदान
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी सहकार चळवळ टिकवण्याकरिता आपले आयुष्य खर्ची घातले.समाजाभिमुख काम करत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने निभावली. त्यांचे आदर्शवत कार्य आजच्या समाजाला दिशादर्शक ठरत आहे. असे प्रतिपादन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले.माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघात आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे बोलत होते. या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.पारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पुढे म्हणाले की, डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी सहकार क्षेत्रात काम करत असताना श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी सभासद आणि कामगारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला. राज्यात सहकार क्षेत्रातील आदर्शवत साखर कारखाना म्हणून या कारखान्यास नावलौकिक मिळवून दिला. त्यांनी लोकोपयोगी कार्य करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समाजवादी विचाराचा आदर्श आजच्या समाजाला दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. असे सांगून त्यांनी आप्पासाहेब उर्फ सा.रे .पाटील यांना अभिवादन केले.जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर बोलताना म्हणाले की गेली ४५ वर्षे आम्ही डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले. याचा आम्हाला अभिमान आहे. शिरोळ तालुका खरेदी विक्री संघ ही त्यांची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळीचे जाळे त्यांनी पसरविले. दत्त कारखाना, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक,यासह अनेक संस्था निर्माण करून या परिसरात रोजगार निर्मिती करून अनेक कुटुंब उभा केली. त्यांच्या आदर्शवत विचाराची आजच्या समाजाला गरज आहे.यापुढेही त्यांनी दिलेल्या विचारानेच आम्ही कार्यरत राहू.माजी नगरसेवक सर्जेराव पवार प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी समाजाभिमुख कामातून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली. समाजवादाचा पगडा जपत सर्वसामान्यांचे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. त्यांच्या आदर्शवत विचाराची जोपासना करत आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल सुरू ठेवली आहे. माजी नगरसेवक रघुनाथ देशिंगे यांनी मनोगत व्यक्त केले.या आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभरात१२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम, गुंडाप्पा पवार, बबलू नलवडे, सागर धोत्रे, संतोष नलवडे, मेजर सतीश माने, लखन नलवडे. युनूस डांगे, माजी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर,अशोक घोरपडे, लक्ष्मीकांत उर्फ बंडा मणियार, चंद्रकांत जाधव घुणकीकर, वासुदेव भोजने, श्रेणिक कुडचे, भुपाल खामकर, श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालिका सौ. अस्मिता पाटील, युवानेते वरून पाटील, वरद पाटील, जयसिंगपूर उदगांव सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, संचालक महादेव राजमाने, अशोक पुजारी, महेश भोसले, राज पवार, पिंटू वगरे,वीरेंद्र निकम, राजू सनदी, स्वप्निल कांबळे,रमजान नदाफ, रंगराव पवार, जयसिंगपूर उदगांव सहकारी बँकेचे व्यवस्थापक जनार्दन बोटे, विनायक कदम, जयसिंगपूर बाजार समितीचे सभापती सुरेश माणगावे, संदीप हवलदार, सोमा गावडे, पप्पू चौगुले, मुसा काझी, संजय चौगुले, राजू उर्फ यल्लाप्पा कोळेकर, दत्तात्रय कोळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि व्ही बॉईज ग्रुपचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.