हार्वेस्टींग मशीने ऊसतोडणीने हिरव्या चाऱ्याची टंचाई,पशुपालक चिंतेत

हार्वेस्टींग मशीने ऊसतोडणीने हिरव्या चाऱ्याची टंचाई,पशुपालक चिंतेत

दत्तवाड / प्रतिनिधी

हार्वेस्टिंग मशीन मुळे शेतातील वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे एकीकडे सोय तर एकीकडे गैरसोय अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या वाट्याला अडचण ही पाचवीला पुजलेली आहे की काय? अशी अवस्था बनली असून वैरण ऐन सीझनमध्ये नसल्याने हार्वेस्टिंग मुळे वैरणीचा प्रश्न म्हणजे डोकेदुखी बनला आहे.हार्वेस्टिंग मशीन आल्यामुळे शेतकरी आनंदित झाला होता कारण एक एकर ऊसतोड करायला तीन दिवस लागत होते पण हार्वेस्टींग मशीनमुळे दोन तासात एक एकर ऊस तुटून जात आहे.मशीनमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असला तरी यातून दुय्यम उत्पन्न म्हणून वैरणीसाठी वाढे मिळत होते.परंतु हार्वेस्टिंग मशीन मुळे पूर्ण उसाचे तुकडे होतात वाढ्याचा पूर्ण पालापाचोळा तयार होतो. व तो जमीनीवर पसरल्यामुळे धड गोळाही करता येत नाही.ऊसतोडणीचा हंगाम सुरु झाला की हिरवा चारा उपलब्ध होतो चाऱ्याचे वर्षभराचे पूर्ण नियोजन पशुपालक करीत असतात. परंतु मशीनच्या साहाय्याने तोडणी केल्याने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर वर आला आहे.जनावरांची हिरव्या चाऱ्या वैरणी विना अडचण निर्माण होत आहे जनावरांचे यामुळे हा बेहाल होत आहे.त्यामुळे हार्वेस्टिंग मशीन म्हणजे असल्याने लवकर तोडणीचा फायदा होतो तर यातून तोटा म्हणजे वाढयाला मुकावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्याची द्विधा अवस्था झालीआहे.वैरणीसाठी काय करायचे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने हार्वेस्टिंग मशीन म्हणजे एकीकडे फायदा तर दुसरीकडे डोकेदुखी बनली आहे.

Spread the love
error: Content is protected !!