पालघरच्या क्वेस्ट संस्थेचा गोष्टरंग नवे दानवाडमध्ये संपन्न डॉ.कलाम फिरती शाळा – शिक्षण आपल्या दारी उपक्रम
दत्तवाड / प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात पालघरची क्वेस्ट संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे बाळकडू देण्यात अग्रेसर असलेली एक संस्था.गोष्टरंग डॉ.कलाम विज्ञान यात्री फिरती शाळा “शिक्षण आपल्या दारी “या संकल्पनेतून नाटकातून गोष्ट सांगितली जाते.विद्योदय फौंडेशनच्या सायली जोशी,गणेश वसावे,सचिन वीर,राजेंद्र चौगुले,गौतम कांबळे यांनी आपल्या अभिनयाद्वारे कॅन्सरविषयक नाटीका व मी व माझे मांजर कथा सादर केल्या.गाणी सादर केली.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मंत्रमुग्ध झाले होते.केंद्रप्रमुख संजय निकम,मुख्याध्यापक मारुती कोळी यांचे वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कुमार सिदनाळे,रमेश शंकर कोळी,सुभाष तराळ,दत्तात्रय कमते,शिवाजी ठोंबरे,सहदेव माळी,दिलीप शिरढोणे, भालचंद्र खोत,सुनिता खटावकर,पुष्पा बाबर,विद्या सुतार,प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले,शंकर पाटील, कल्लाप्पा पुजारी, काशीनाथ मोडके यांचेसह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.