नरंदे / प्रतिनिधी
नरंदे तालुका हातकलंगले येथील गट क्रमांक 218 मधील 10 हजार चौरस जागेत बंदिस्त हॉल व कंपाऊंड बांधकाम थांबवण्यासाठी नरंदे ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गेले असताना सदर जागेवरती बांधकाम करत असणारे नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक हर्षवर्धन देशमुख,नमिता देशमुख,चेअरमन प्रतापराव देशमुख व अन्य शिक्षक सहकारी यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्य व सरपंच सौ पूजा कुरणे यांनी हातकणंगले पोलिसांना निवेदन देऊन हातकणंगले तहसीलदार व हातकणगले पोलीस निरीक्षक यांना सदर प्रश्नी तात्काळ लक्ष घालण्याची विनंती केली.सदर घटनास्थळी संतप्त नागरिकांनी चालू असलेले बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यावेळी झालेल्या वादविवादात काही प्रमाणात सदर बांधकाम पाडण्यात आले,सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता तमदलगे सूतगिरणीवर हातकणंगले तहसीलदार व पोलीस निरीक्षक व नरंदे ग्रामस्थांची तात्काळ बैठक बनवून सदर प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी शासकीय दरबारी लवकरात लवकर बैठक लावून सदर प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन आमदार अशोकराव माने यांनी दिले.यावेळी नरंदे ग्रामस्थांच्या वतीने हातकणंगले तहसीलदार, पोलीस निरीक्षक व जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून नरंदे ग्रामस्थांचा असणारा भावनेचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व सदर जागेवरती सुरू असलेले बांधकाम कायमस्वरूपी थांबवावे अशी मागणी केली.यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.