शेडशाळ केंद्रस्तरीय जिल्हापरिषद अध्यक्ष क्रीडा स्पर्धा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

डिसेंबर महिना उजाडला की सर्व जिल्हा परिषद शाळांना वेध लागतात ते म्हणजे विविध स्पर्धांचे. मुलांच्या बौद्धीक विकासासोबतच शारीरिक,मानसिक व सामाजिक विकास होणे गरजेचे असते. हा उद्देश्य साध्य होण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.
मंगळवार दि.१० डिसेंबर २०२४ रोजी शेडशाळ केंद्रांतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धेस कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद येथे सुरुवात झाली. वैद्यकीय अधिकारी जगदीश परमार यांचे हस्ते व सरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.केंद्रप्रमुख संदिप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,पालक,तरुण मंडळे,केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. वरीष्ठ गटाच्या सांघिक व कनिष्ठ गटाच्या वैयक्तिक स्पर्धा व कुस्ती अत्यंत चुरशीने व खेळीमळीत पार पडल्या. तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी व बीट शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद (गाव) शाळेच्या शिक्षकवृंदानी सुरेख आयोजन केले होते.

Spread the love
error: Content is protected !!