पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलंआणि पाहिलंही असेल.पण हातकणंगले तालुक्यातील तालुक्यातील पुलाची शिरोली गावात एका वेगळ्याच डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे.कारण ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची…खरं वाटत नाही ना? पण हे खरं आहे.पुलाची शिरोली येथील बबन तानवडे या शेतकऱ्याने पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा आनंद देऊन साजरा केला. यासाठी त्यांनी संबंधित मित्रपरिवार पै पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.पुलाची शिरोली येथील शेतकरी कुटुंबीयांनी गायीचा डोहाळेजेवण कार्यक्रम साजरा केला.प्रत्येक शेतकरी त्याच्याकडील प्रत्येक जनावरला त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणेच वागवतो.त्यातही प्रामुख्याने गायीला प्रत्येक शेतकऱ्याच्य घरात विशेष स्थान दिलं जातं.परंतु तानवडे कुटुंबाने गायीचं डोहाळेजेवण घालून त्यांचं त्यांच्या गायीप्रती असलेले प्रेम व्यक्त केलं.यावेळी डोहाळे जेवणासाठी महिलांनी खण नारळाने गायीचे ओटीभरणही केले. त्यानंतर पाच प्रकारची फळे हरनीलि खाऊ घालण्यात आली आणि त्यानंतर डोहाळे जेवणाच्या पंग बसल्या. हरनी गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असं सांगत तानवडे दाम्पत्याने मायेपोटी चक्क हरनी या गायीचे डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात सर्व मित्र परिवार व पै पाहुण्यांना गोडा – धोडा चे जेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे.पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.हरनी गाय ही तानवडे कुटुंबातील सदस्य बबन तानवडे यांच्य कुटुंबीयांनी सातवर्षापूर्वी ही गाय बबन तानवडे यांच्या घरी जन्मास आली होती. हरनी गाय आपल्यापासून त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली. हे सर्व पाहून बबन तानवडे यांनी तिला घरची मुलगी म्हणूनच सांभाळायला सुरुवात केली. तसेच या गाईचे नाव हरनी असे ठेवले. हरनी गाय गेल्या सात महिन्यांपासून गाभण आहे. तेव्हापासून घरातील सर्वजण आनंदात आहेत.सात महिन्यांनंतर आता डोहाळे जेवणासाठी घर फुलांनी सजवले. स्वतःच्या मुलांप्रमाणेच तानवडे दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात.गायीला ज्याप्रमाणे मुलीसारखे वागवले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. समाजामध्ये गायीवरील श्रद्धा,गायींचे आपल्या जीवनातील स्थान, तसेच पशुधनावर प्रेम करायला हवे, मानवाप्रमाणे गोमातेचे रक्षण झाले पाहिजे, असा संदेश समाजापुढे ठेवण्यासाठी हा उपक्रम राबण्यात आला आहे.