शिरोळ / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन,माजी आमदार स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.त्याचप्रमाणे स्व.दत्ताजीराव कदम (आण्णा) यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी, स्व.दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक ज्योतीकुमार पाटील यांनी व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक अमर यादव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील दादा,संचालक अनिलकुमार यादव,शेखर पाटील, बसगोंडा पाटील,दरगू माने-गावडे,सत्यजित उर्फ नाना कदम,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,पंचगंगा साखर संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,गजानन संकपाळ, दत्त वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.