जयसिंगपूर / प्रतिनिधी
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ क.मधील युनिट क्रमांक ३ ची दुसरी कॉन्फरन्स हरिपूर येथे उत्साहात संपन्न झाली.या द्वितीय कॉन्फरन्समध्ये जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटीला सर्वोत्कृष्ट ग्रुप म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या ग्रुपचे कार्यतत्पर कार्यवाह सचिन लोहार यांना उत्कृष्ट कार्यवाह( सचिव ) म्हणून गौरविण्यात आले.या स्नेह मेळाव्यात जायंट्स ग्रुप ऑफ दिव्या सहेली संभाजीपुरच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्षा म्हणून गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा सौ अश्विनी नरुटे आणि कार्यवाह श्रीमती प्रतिभा ढापरे यांना उत्कृष्ट अध्यक्षा आणि उत्कृष्ट सचिव म्हणून सन्मानित करण्यात आले. या ग्रुप्सना वर्षभर..फेडरेशन समन्वयिका डॉ.सौ स्नेहल कुलकर्णी, फेडरेशन स्पेशल ऑफिसर सुधीर कुलकर्णी,आणि दिव्या सहेलीच्या खजिनदार ॲड.भाग्यश्री जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व ग्रुपच्या सदस्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले.या कॉन्फरन्समध्ये फेडरेशन २ क चे उपाध्यक्ष प्रशांत माळी,समन्वयिका सौ स्नेहल कुलकर्णी,स्पेशल ऑफिसर भैया कुलकर्णी,डायरेक्टर सौ सुनीता शेरीकर यांच्या हस्ते एकूण ११ ग्रुपला त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.याप्रसंगी गोल्ड सिटीचे अशोक गुंडे, एकनाथ मगदूम,शंकर देसाई,अरविंद मोघे,प्रा.सिताराम चव्हाण,दुर्गा सहेलीच्या सौ.अश्विनी नरुटे, सौ नलिनी देसाई यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.