पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोतिबा डोंगर ते सादळे – मादळे या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता.आज शिये (ता. करवीर) येथील डोंगर शेजारी असणाऱ्या धाकोबा मंदिर परिसरात रात्री ९ वाजून १५ वाजण्यासुमार वस्तीवर आलेल्या मेंढ्यांच्या कळपात बिबट्याने हल्ला चढवून एका शेळीचा पडशा पाडला बिबट्याने हल्ला करताच मेढ्यानी आरडा ओरड सुरू केला मेंढ्यांचा आरडाओरड ऐकून मेंढपाळ सुरेश सिसाळ यांच्यासह धनगर समाजाच्या लोकांनी मेंढ्यांच्या कळपाकडे धाव घेतली तेव्हा त्याना बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून त्यास खाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आला मेंढपाळ यानी आरडाओरड केल्यावर बिबट्याने जबड्यात धरलेली शेळी तिथेच टाकून शेतवडीत पलायन केले.या परिसरात बिबट्या आल्यामुळं नागरिकाच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती मेंढपाळ सुरेश सिसाळ यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी येऊन पाहणी केली.