शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथे सुरू असलेल्या उरुसाच्या पार्श्वभूमीवर रात्री पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना बुवाफन मंदिराच्या परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.इंद्रजीत मोहन गुरव (वय,३२ रा. कोंढवे, ता.सातारा, जि. सातारा) याला बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. संशयित आरोपी गुरव याच्यावर सातारा, बारामती,व पुणे येथील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २४ गुन्हे दाखल आहेत.शिरोळमध्ये इंद्रजीत गुरव हा रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन स्क्रू-ड्रायव्हर,एक्सा ब्लेडचे तुटलेले पाते घेऊन अपराध करण्याच्या उद्देशाने बुवाफन मंदिराच्या परिसरामध्ये संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आला.दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले.त्याच्यावर कोरेगाव, सातारा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.ही पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, पोलीस हवालदार कुंभार,पोलीस शिपाई युवराज खरात यांनी केली.अधिक तपास सहाय्यक फौजदार नाईक करीत आहेत.