पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – बंडू पाटील

हेरवाड / प्रतिनिधी

पंचगंगा नदीला गेली चार दिवसांपूर्वी दूषित पाणी आल्यामुळे तेरवाड येथील बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिले असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता स्वाभिमानी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी दिली आहे.यावेळी बंडू पाटील म्हणाले पंचगंगा नदी प्रदूषणास साखर कारखानदार,औद्योगिक वसाहतीतील विना प्रोसेस केलेले सांडपाणी सोडल्यामुळे नदी प्रदूषण होत आहे.या सर्वच घटकांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असले असल्याने पंचगंगा नदी वारंवार प्रदूषित होत असते. विना प्रक्रिया सांडपाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदी काठीच्या नागरिकांना साथीच्या आजाराबरोबर कॅन्सर सारख्या भयानक रोगाला सामोरे जावे लागत आह.येत्या दोन दिवसात या प्रदूषण करणाऱ्या साखर कारखाने,औद्योगिक वसाहत, नगरपालिका यासह प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा बंडू पाटील यांनी दिला आहे.

Spread the love
error: Content is protected !!