भगवान शंकरांनी एकदा डमरू वाजवला त्याच्यामधून तीन अक्षरे निघाली अ उ आणि म या तीन अक्षरां या एकवटून ओम तयार झाला. याची वाक्यरचना तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि उपनिषद मध्ये मिळेल लहानपणापासून आपण अ ते ज्ञ पर्यत शिकत आलेलो आहे.पण या अक्षरांचा उत्पन्न कुठून झाला आहे.याची आपल्याला जाणीव नव्हती. महादेवाच्या डमरूतून निघालेल्या ध्वनीतून उत्पन्न झालेला स्वर पुढे जाऊन याच स्वरांमधून अ ते ज्ञ पर्यंत वर्णमाला तयार झाल्या.‘ओम’ या अक्षराचे उच्चारण केल्याने त्यातून निघालेली कंपन व तीव्रता आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे हे तुम्हाला अनुभव केल्यावरच कळेल अलीकडे नासाने केलेल्या एका रिसर्चमध्ये कळाले की युनिव्हर्समधून येणारा आवाज हा ‘ओ’ आहे म्हणजे आपल्या पुराणांमध्ये दिलेल्या ओम या अक्षराची वाक्यरचना खोटी तरी नाहीये हे आपल्याला कळते थोडा वेळ जर आपण आपल्या सनातन धर्माला दिला, तर या परदेशात बसलेल्या लोकांनी रिसर्च करून शोधून काढलेल्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष आधी शोधून ठेवलेल्या आहेत हे आपल्याला माहिती पडते.