ऊस दर बैठकीस कारखानदारांनी पाठ फिरवल्याने आंदोलन अंकुश संघटना आक्रमक

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी ऊस दराच्या संदर्भात आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक बोलवण्यात आली होती.मात्र या बैठकीला कारखानदारांच्या वतीने कोणीही हजर राहिले नसल्याने आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाली असून बैठकीत ढोंग साखर कारखानदार व जिल्हा प्रशासनाने चालू केला असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापूर येथे साखर आयुक्त व जिल्हा प्रशासन यांच्यावर केला आहे.दरम्यान साखर सह संचालक यांनी नोटीस काढून देखील आजच्या बैठकीला साखर कारखानदार प्रतिनिधी हजर राहत नाहीत हा जिल्हा प्रशासन व साखर सह संचालक यांची काय लायकी ठेवली आहे.

ते अधिकाऱ्यांनी पहावे असा टोला ही धनाजी चुडमुंगे यांनी लगावला आहे.तर आजची बैठक रद्द करून पुन्हा दोन दिवसांनी बैठक होणार आहे.दोन दिवसात बैठक घेऊन तोडगा न काढल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडणार आणि त्यावेळी कोणाचेही ऐकले जाणार नाही असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

Spread the love
error: Content is protected !!