कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी,शेडशाळ,कवठेगुलंद, आलास,बुबनाळ,औरवाड आणि गौरवाड या सात गावांमध्ये एसटी बससेवेच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत कुरुंदवाड आगार प्रमुखांना
छत्रपती ग्रुपचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे,शिरोळ तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता निवेदन कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे यांना देण्यात आले.निवेदनानुसार तात्काळ चालक वाहकांची बैठक घेऊन सूचना करून मागणीची पूर्तता करू असे आश्वासन आगार प्रमुख पतंगे यांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की,या सात गावांमधील एसटी बससेवा वेळेवर आणि नियमित उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पोहोचण्यासाठी तसेच,ज्येष्ठ नागरिक,महिला, माता-भगिनींनाही आवश्यक सेवा मिळवताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.एस.टी बससेवा नियमित करून तातडीने उपाययोजना करावी आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना छत्रपतींचे प्रदेशाध्यक्ष मलमे म्हणाले सात गावांमध्ये एसटी बससेवेची अनियमितता नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे.एसटी प्रशासनाने तातडीने कारवाई करून बससेवा नियमित करावी,अशी आमची ठाम मागणी आहे.या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.यावेळी छत्रपती ग्रुपचे अविनाश पाटील,संदीप पवार,कुरुंदवाड शहर प्रमूख प्रदीप चव्हाण,संदीप पाटील,प्रमोदभाऊ पाटील,संदीप पाटील,सागर बिरणगे,प्रदीप चव्हाण,अशपाक ढालाईत, प्रमोद मलमे,सुनील नाईक,प्रवीण नाईक,सुहास कोळेकर, राहुल हुलवान,प्रशांत कोळेकर,प्रकाश हाणबर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.