पु.शिरोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ,पाच ठिकाणी धाडसी घरफोड्या,लाखोंची रोकड लंपास

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जैन मंदिरासह अन्य चार ठिकाणी धाडसी चोरी झाली असून यामध्ये सात ते आठ लाखांचा मुददेमाल लंपास करण्यात आला आहे.ही घटना आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजाण्याच्या सुमारास उघडकीस आली. मंदिरच्या कार्यालयातील कपाटातील चांदीचे दागिने ठेवून साडेपाच लाखाची रोकड लंपास केली आहे.पाच ते सहा जण चोरी करताना सिसिटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. गेल्या काही दिवसात पाच ठिकाणी झालेल्या चोरीची वेळ मध्यरात्री दीड ते ४ वाजण्याच्या वेळेत असल्याने चोरी एकाच टोळीने केल्याचा अंदाज नागरिकातून व्यक्त होत आहे.याबाबत घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी की नागाव फाटा येथील मल्लिकार्जुन कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या सुरेश पांडुरंग गिरी यांच्या बंद घराचे कडी कोयंडा उचकटुन मध्यरात्री दीड वाजण्यासुमार घरात प्रवेश करून घरातील साहीत्य विस्कटुन कपाटातील ४० हजार किमतीचे सोन्याचे मनी व रोख १५ हजार लंपास केले.गिरी यांचे मुळगाव कर्नाटकातील रासाई शेंडूर असून प्रत्येक शूक्रवारी गावाकडे शेती करण्यासाठी जाता यावेळी ते गेले असताना हि चोरी घडली त्यांतर चोरट्यांनी शिरोली येथील यादववाडी येथील मेनन काॅलणीतील दोन बंद घराचे कडी कोयंडा उचकटुन घरातील साहीत्य विस्कटुन मुद्देमाल शोधण्याचा प्रयत्न केला पण १ हजार व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही.हातात तुटपुंजी मुद्देमाल हाती लागल्याने नैराश्यात चोरट्यांनी मोठ्या मुद्देमालाल्या शोधात त्यानी सांगली फाटा येथील जैन मंदिर व पारस मेटल फोडण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे
कोल्हापूर सांगली महामार्गावर दक्षिण महाराष्ट्रातील जैन धर्मीयांचे धर्मस्थळ ठिकाणी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मागील बाजूस असलेल्या प्रवेश द्वारातून आत प्रवेश केला.मंदिराचे कार्यालय फोडून  कार्यालयातील तिजोरी कटावणीच्या सहय्याने उचकटुन तिजोरीत सुमारे साडेपाच लाख रुपये चोरट्यांच्या हाती लागले.पण चोरट्यानी अंदाजे दोन किलो चांदीचे ठेऊन फक्त रक्कमच लांबवली,तसेच मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या  एका भांडी दुकान फोडले येथेही चोरट्यांनी लाखाची रक्कमेवर डल्ला मारला.एका रात्रीत शिरोली व नागाव परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी धुमाकूळ घातला या चोरट्यानी पोलिसांच्या समोर आव्हान निर्माण केले आहे.चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले,श्वान स्टेला घटनास्थळाच्या काही मिटर अंतरापर्यंत घुटमळले.दरम्यान चोरट्यानी मंदिर परिसरात चोरी करताना वीस ते पंचवीस किलोचा घडीव दगड कार्यालयात कशासाठी कोणत्या कारणासाठी आणला असावा घटनास्थळी तर्कवितर्क लावले जात आहेत. मंदिरामागिल बाजूस असणाऱ्या एक दुकानाच्या कॅमेरात कैद झाले असून चेहरे अंधुक दिसत असल्याने या चोरीचा छडा लावण्यासाठी विषेश पथकाच्या मार्फत तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.
Spread the love
error: Content is protected !!