दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.ई-मेलच्या माध्यमातून शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे,तर धमकी देणाऱ्याकडून 30 हजार डॉलरची मागणी देखील करण्यात आल्याचे ही समजते.या संदर्भातअधिक माहिती अशी की दिल्ली येथील स्कुटी लांजा इलेव्हन नावाने असणाऱ्या जीमेल अकाउंट वरून दिल्लीतील जवळपास 40 शाळांना हा मेल पाठवला असल्याचे सांगण्यात येत आहे.या सगळ्या शाळेच्या इमारतीच्या त्या बॉम्बनं उडवून देऊ अशी धमक मेलवरून देण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी देखील अनेक शाळांना असा धमकीचा मेल मिळालेला होता.सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सकाळच्या सत्रात शाळा भरतात,शाळांना धमकीचा मेल मिळाल्यामुळे सगळ्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहेत. त्यामुळे सगळ्या मुलांना शाळेमधून पुन्हा घरी पाठवण्यात आले आहे.सर्व शाळांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कुठलीही संशयस्पद वस्तू आत्तापर्यंत तरी सापडलेली नाही, मात्र हे अकाउंट नेमकं कुणाचाही ते कोणत्या आयपी ऍड्रेस वरून पाठवण्यात आलं आहे याचा शोध दिल्ली पोलीस करत आहेत. धमकीमुळे शाळा भरवायचे की नाही हे पोलिसांनी तपास करून परवानगी देतील त्यानंतरच शाळा प्रशासनाला शाळा भरवण्याची परवानगी दिली जाणार आहे.शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीमुळे शाळा प्रशासन व पालक वर्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
