महामानवांना अभिवादन करून दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने यांनी घेतली शपथ

हातकणंगले / प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना अभिवादन करून हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांनी आज विधानभवनात सदस्य पदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली.पाठोपाठ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून,शनिवारी विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सत्ताधारी पक्षातील पहिल्या दिवशी सत्ताधारी गटातील 200 आमदारांनी शपथ घेतली.आज हातकणंगले विधानसभा मतदार संघातुन जनसुराज्य पक्षाचे नवनिर्वाचित आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी विधानभवनात शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आमदारांना शपथ दिली.यावेळी आमदार डॉ माने म्हणाले परिवर्तनाचा ध्यास घेऊन जनतेने दिलेल्या भरभरून मतांच्या जोरावर मिळालेला विजय नक्कीच सार्थकी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन! मतदारसंघाचा विकास,तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहणार असून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व विकास करण्याच्या हेतूने आज विधानभवन मुंबई येथे ‘विधानसभा सदस्य’ म्हणून शपथ ग्रहण केली असल्याचे आमदार माने यांनी सांगितले. दरम्यान आमदार डॉ अशोकराव माने यांनी शपथ घेतल्यानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यानी फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.

Spread the love
error: Content is protected !!