नरंदे प्रतिनिधी / आकाश शिंदे
सातारा येथे झालेल्या शालेय शासकीय विभागीय किकबॉक्सिंग स्पधेमध्ये कोल्हापुरच्या संघातून ब्रिलियंट स्कुलस् नरंदेच्या चार मुलांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये १९ वर्षाखालील गटात रोहन गणेश ढोबळे याने सुवर्णपदक पटकावले. तर १७ वर्षाखालील गटात लोकेश विनोद खंडाळे याने सुवर्णपदक पटकावले. आर्यन शशिकांत नागरगोजे याने रौप्यपदक पटकावले. रितेश राजेंद्र चव्हाण याने कास्यपदक पटकाविले. वरील सर्वच विद्यार्थांची राज्यस्तरीय शालेय शासकीय स्पर्धेसाठी निवड झाली.यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचे क्रिडा विभाग प्रमुख किरण थोरात, नेमिनाथ मगदुम, शरद क्षीरसागर, अरुण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व संस्था अध्यक्ष नितिन पाटिल, मुख्याध्यापिका शुभांगी पाटील, पर्यवेक्षक संदिप निकम व कार्याध्यक्ष संजयसिंह पाटील यांचे प्रत्साहन लाभले.