आमदार पाटील शब्द पाळणार का?…जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीचे वेध

जयसिंगपूर / अजित पवार

विधानसभेच्या निवडणुकीनंतर इच्छुकांना नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या तीन नगरपालिकांमध्ये सध्या प्रशासकीय राज आहे. यामुळे त्या त्या ठिकाणचे इच्छुक आता मिशन नगरपालिका याकरिता झटू लागले आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांना नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्या जयसिंगपूर, शिरोळ, आणि कुरुंदवाड या शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांवर प्रशासक राज आहे. यामुळे येथे कोणत्याही वेळी निवडणुका होऊ शकतात. जयसिंगपूर येथे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सत्ता होती. पण येथे नगराध्यक्षपदी मात्र ताराराणी आघाडीचे सदस्य होते. शिरोळ येथे राजेंद्र पाटील यड्रावकर यांची एक हाती सत्ता होती. नगराध्यक्षपदी त्याच गटाचे नगराध्यक्ष होते. कुरुंदवाड येथे काँग्रेसची सत्ता असल्याकारणाने तेथे मात्र यड्रावकर व्यतिरिक्त असलेल्या काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयराम पाटील यांची सत्ता होती.नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिरोळ तालुक्यातील या तीन नगरपालिकेच्या निवडणुका कधी होतात याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांनी मात्र कंबर कसली आहे. या नगरपालिकांत सद्यस्थितीला प्रशासक राज्य असल्याकारणाने येथे विकास कामे मात्र काही भागात सुरू आहेत.तर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सुरू आहेत.त्यामुळे पदावरून मुक्त झालेल्या नगरसेवकांची गोची होऊ लागली आहे.त्यातच काम सांगायचे कोणाला असा प्रश्न निर्माण होत आहे.पालिका निवडणुका भाजपशासित राज्य असल्याकारणाने नगराध्यक्ष जनतेतून अशी होण्याची चिन्हे आहेत. तर दोन सदस्य, तीन सदस्य अथवा चार सदस्य प्रभाग रचना होऊन अशा पद्धतीने निवडणूक होतील याकडे आता इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.भाजपशासित राज्य असल्याकारणाने जनतेतून नगराध्यक्ष आणि प्रभागातून नगरसेवक निवडले जाऊ शकतात. अशी सध्या तरी चिन्हे आहेत. पण दोन सदस्य अथवा चार सदस्य याबाबत शासन निर्णय होणार आहे. 2016 मध्ये झालेल्या जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष आणि प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे होते. यामध्ये जनतेतून नगराध्यक्ष ताराराणी आघाडी पक्षाचे विराजमान झाले. तर सत्ता मात्र राजर्षी शाहू विकास आघाडीची आली यामुळे शहराचा विकास किती मोठ्या प्रमाणावर झाला हे जनतेला ही सर्वश्रुत आहे.विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या प्रचारात अनेक आश्वासने दिली गेली आहेत.तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.जयसिंगपूर,शिरोळ आणि कुरुंदवाड येथे विद्यमानांना रोखण्यासाठी विरोधकांचे पॅनल होणार का असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

आमदार पाटील शब्द पाळणार का?…

विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान विधान परिषदेचे आमदार काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जयसिंगपूर पालिकेत होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण स्वतंत्र पॅनेल करू असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत. पण सध्या बदललेले चित्र पाहता आमदार पाटील आपला शब्द पाळणार का? हे आता पहावे लागणार आहे.

Spread the love
error: Content is protected !!