इचलकरंजी शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघडकीस

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरांमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती त्याचा अनुषंगाने इचलकरंजी शहरांमध्ये पुणे रेल्वे विभाग व कोल्हापूर रेल्वे विभागाने संयुक्तपणे शहरातील मध्यवर्ती रेल्वे बुकिंग करणाऱ्या काही एजंटवर छापा टाकून सुमारे आठ तास चौकशी केली.यामध्ये रेल्वे तिकीटामध्ये काळाबाजार होत असल्याचे निष्पन्न झाले तर यातील एकाला रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक परगावी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करत असतात पण काही एजंट कडून रेल्वे चे तिकीट बेकायदेशीरपणे बुकिंग करून जादा दराने विकली जातात याच अनुषंगाने इचलकरंजी शहरांमध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये शहरांमध्ये छापा टाकून काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे.पण तरीसुद्धा एजंटवर काही फरक पडत नाही पण रेल्वे पोलिसांनी अशी धडक मोहीम सातत्याने ठेवली आहे.त्यामुळे एजंटांवर चांगलाच चाप बसला आहे.काल इचलकरंजी शहरातील काही रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंटवर छापा टाकून एकाला ताब्यात घेतला आहे.त्यामुळे इचलकरंजी शहरांमध्ये बेकायदेशीरपणे रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

Spread the love
error: Content is protected !!