इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील व महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील परिवहन खात्याची फसवणूक करण्याचा गोरख धंदा टेम्पो ट्रॅव्हल्स चालकांनी लावला होता.टेम्पो ट्रॅव्हल्स वर गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची लावून बिंदासपणे टेम्पो ट्रॅव्हलर भाडे करत होते.दोन्ही राज्याचा टॅक्स वाचवण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्स दुसरी नंबरप्लेट लावून गाडी चालवत होते याची माहिती इचलकरंजी आरटीओ खात्याच्या पोलिसांना मिळताच काल अब्दुललाट येथे जाऊन एक टेम्पो ट्रॅव्हलर्स जप्त करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या बॉण्ड्रीवर असणार्या इचलकरंजी शहरातून व खेड्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात फिरायला जात असतात पण कर्नाटक व महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यांनी प्रत्येक प्रवाशावर कर बसवला आहे त्यामुळे हा कर चुकवण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्स चालकांनी एक नामी शक्कल लढवली कर्नाटक मध्ये जायचं असेल तर गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची महाराष्ट्रात यायचं असेल तर गाडी एकाची तर नंबर प्लेट दुसऱ्याची टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांनी हा टॅक्स चूकण्यासाठी नवीन उद्योग सुरू केला आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये काही टेम्पो ट्रॅव्हलर्स जप्त करण्यात आल्या होत्या याच अनुषंगाने अशाच पद्धतीने इचलकरंजी शहरांमध्ये आणि कर्नाटक मध्ये असाच प्रकार सुरू होता याची माहिती इचलकरंजी राज्य परिवहन च्या पोलीस अधिकारांना मिळताच त्यांनी काल अब्दुलाट येथे कर्नाटक येथून एक टेम्पो ट्रॅव्हलर्स गाडी एकाची नंबर प्लेट दुसऱ्याची लावून येत होता पोलिसांनी अडवले असता त्यावेळी त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली राज्य परिवहनच्या पोलिसांनी ही टेम्पो जप्त करून त्याच्यावर कारवाई केली आहे काही प्रामाणिक टेम्पो ट्रॅव्हल्स चालक शासनाचा टॅक्स भरून भाडी करतात पण असे काही टेम्पो ट्रॅव्हल्स चालक नंबर प्लेट एकाची गाडी दुसऱ्याची व आतील इंजिन चेस नंबर दुसऱ्याचेच राज्य परिवहन खात्याच्या पोलिसांनी हे सगळे चेक केला असता तर या गाडीमध्ये नंबर प्लेट दुसरी असल्याची आढळून आली पोलिसांनी याच्यावर सध्या कारवाई केली आहे प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे इचलकरंजी शहरांमध्ये असे बरेच टेम्पो ट्रॅव्हलर्स चालक आहेत की बिंदिकतपणे नंबर प्लेट चेंज करून मोठ्या प्रमाणात भाडी करतात व दुसरी नंबर प्लेट लावून संपूर्ण भारत भ्रमंती हे टेम्पो ट्रॅव्हल्स चालक शासनाचा कर चुकूउन करतात त्यामुळे शहरांमध्ये व कर्नाटक बॉण्ड्री वर असणाऱ्या काही खेडेगावांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात टेम्पो आहेत याचाही शोध आरटीओ विभागाने घ्यावा काल अब्दुल लाट मध्ये आरटीओ ने टेम्पो ट्रॅव्हल्स जप्त करून त्याच्यावर कारवाईचा भडगा उगारला आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे टेम्पो ट्रॅव्हल्स नंबर प्लेट चेंज करणाऱ्या मालकांमध्ये सध्या खळबळ माजली आहे या घटनेमुळे प्रामाणिक टेम्पो ट्रॅव्हल्स चालकांनी समाधान व्यक्त केले ही कारवाई आरटीओ खात्याचे अधिकारी विजय इंगवले किरण खोत गणपतराव माशाळकर नितीन देसाई यांनी कारवाई केली आहे ही कारवाई असच सातत्याने सुरू राहावी अशी मागणी सध्या टेम्पो ट्रॅव्हलर असोसिएशन कडून करण्यात येत आहे