आळते येथे मोटरसायकलस्वाराच्या धडक एक जण जागीच ठार

आळते त मोटस्वाराची धडक एक जण जागीच ठार

हातकणंगले / प्रतिनीधी

आळते ता हातकणंगले हद्दीत हातकणंगले – वडगांव रोड वर मदरश्या नजीक भरघाव मोटारस्वाराने जोराची धडक दिल्याने विजय पारीसा कनवाडे ( वय ६५ ) मुळगांव आळते सध्या राहणार जवाहरनगर इचलकरंजी या पादच्याऱ्याचा जागीच मृत्यु झाला . याबाबत घटना स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,मयत विजय कनवाडे यांची आळते येथे वडीलोपार्जीत शेती आहे इचलकरंजी हून आळते येथे शेतीची कामे करण्यासाठी कनवाडे हे एस टी बसने येतात . आज दुपारी ही शेताकडे जाण्यासाठी कनवाडे हे इचलकरंजी हून आळते कडे एस टी बसने आले होते . ते शेतीचे काम आटोपूने परत इचलकरंजी येथील घरी जाण्यासाठी येथील हातकणंगले -वडगांव रोडवरील मदरसा येथील बस थांब्यावर जात असताना हातकणंगले हून वडगांवच्या दिशेने मोटरसायकल क्रमांक एम एच ०९ जी आर १४७० वरून निघालेल्या अथर्व ठाणेकर व प्रथमेश पाटील यांनी जोराची धडक दिल्याने विजय कनवाडे हे गंभीर जखमी झाले होते, उपचारास नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला . तर मोटारसायकलवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर उपचारार सुरू आहेत.अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत

Spread the love
error: Content is protected !!