महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त स्केटिंग व श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात,स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहेतर प्रथम तर श्वान स्पर्धेत अण्णाप्रेमीचा ईगल श्वान प्रथम

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त स्केटिंग व श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात
स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहेतर प्रथम तर श्वान स्पर्धेत अण्णाप्रेमीचा ईगल श्वान प्रथम

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त बुधवारी खुलागट आणि इनलाईन स्केटिंग तसेच गाडी मागून श्वान पळविणे स्पर्धा उत्साहात पार

पडल्या स्केटिंग स्पर्धेत रोहन माळी व पियुष मेहतर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.बुधवारी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्री दत्त शेतकरी सहकारी

साखर कारखान्याच्या परिसरात खुलागट व इनलाईन स्केटिंग स्पर्धा तसेच जुना कुरुंदवाड रस्त्यावर कोल्हापूर जिल्हा गाडी मागून श्वान शर्यत असोसिएशनच्या मान्यतेने गाडी मागून श्वान

पळविण्याची स्पर्धा पार पडली विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व शिल्ड आणि चषक पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी युवा नेते किरण पाटील सुशांत कुंभार

विनोद केपंवडे बाळासाहेब ढाले लक्ष्मण माने गावडे रमजान मुल्लाणी वैभव शिंदे जगन्नाथ साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खुलागट स्केटिंग स्पर्धा-रोहन माळी(प्रथम),हर्षवर्धन दबडे- इचलकरंजी(द्वितीय),गौरव खोत इचलकरंजी(तृतीय)इनलाईन स्केटिंग स्पर्धा पियुष मेहतर(प्रथम),कुबेर कोळी(द्वितीय)ध्रुव

पाटील(तृतीय)यांनी यश मिळवलेया स्केटिंग स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तेजस पाटील व सुभाष काळे यांनी पंच म्हणून काम पाहिले शेखर शिंदे विशाल शिंदे प्रणव कांबळे दत्ता जावीर यांचे सहकार्य लाभले.

जुना कुरुंदवाड रस्त्यावरील गाडी मागून श्वान पळविण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रदीप गावडे रमेश माने दीपक ढवळे दीपक गावडे ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गाडी मागून श्वान पळविण्याच्या स्पर्धेत अण्णा प्रेमीचा ईगल या श्वानाचा प्रथम मायाक्का प्रसन्नचा अग्नी या श्वानाचा द्वितीय राहुल चव्हाण यांच्या टाग्या या श्वानाने तृतीय क्रमांक मिळवला

या स्पर्धेत टाईम कीपर म्हणून अक्षय दावणे (चिंचवाड) आणि समालोचक म्हणून शुभम कमलाकर (रुईचंदुर) यांनी काम पाहिले धीरज शिंदे रवी गावडे लखन कुंभार यांचे सहकार्य लाभले.

सायंकाळी येथील श्री बुवाफन महाराज मंदिरासमोरील कै माजी आमदार दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्त्यांचे जंगी मैदान झाले या मैदानात अनेक चटकदार व रंगतदार अशा

कुस्त्या पार पडल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.हजरत नूरखान बादशाह दर्गाह येथे प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या

उपस्थितीत गंधरात्र हा धार्मिक सोहळा पार पडला.यानंतर पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर बक्षीस वितरण व सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.यानंतर

रूपचंद्रिका मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती.

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस साजरा करण्यासाठी उत्सव व उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,माजी ग्रामपंचायत

सदस्य विजय आरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी,खजिनदार राहुल कोळी,सचिव किरण जगताप ऑडिटर

पिराजी जयान्नावर,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे,कार्याध्यक्ष संतोष घाडगे,संयोजक लखन कुंभार,सहसंयोजक सागर कांबळे, सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी

सहखजिनदार कुमार जयान्नावर,नितीन कोळी,सहऑडिटर प्रताप जगदाळे,सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत .

Spread the love
error: Content is protected !!