रस्त्याची दुरुस्ती व दिशादर्शक फलक लावा अन्यथा सा.बां.कार्यालयास टाळे ठोकू छत्रपती ग्रुपचा इशारा

कुरुंदवाड / प्रतिनिधी

खिद्रापूर ता शिरोळ येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. सैनिक टाकळी ते खिद्रापूर रस्त्याची डागडुजी नसल्याने व दिशाद्रक फलक नसल्याने अपघात होऊन युवतीचा अपघाती निधन झाला आहे.तर अनेक वेळी अपघात होऊन अनेकजण जखमी होऊन अपंगत्व नशिबी आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे या मागणीसाठी प्रमोद दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती ग्रुप तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राजापूरवाडी ता.शिरोळ येथील कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रविराज चव्हाण यांना दिले.यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत प्रारंभी अपघाती निधन झालेल्या युवतीला श्रद्धांजली वाहिली.

घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी बोलताना छत्रपती ग्रुपचे नेते रोहित मलमे म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशाच नाकर्तेपणामुळे गेल्या वर्षी खिद्रापूर येथील महिलेचा अकिवाट मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ खड्ड्यात गाडी आपटून पडल्याने जागीच मृत्यू झाला होता. या अपघातातून जीवित हानी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.खिद्रापूर कडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे येत्या आठ दिवसात दागडूजी दुरुस्ती आणि दिशादर्शक फलक लावावे अन्यथा शिरोळ तालुक्यातील छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयावर काढून कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करू असा इशारा दिला.छत्रपती ग्रुपचे तालुकाध्यक्ष संदीप अविनाश पाटील,जमीर दानवाडे,ग्रा. प सदस्य इर्शाद मुजावर, अमित कदम आदींनी भाषणे केली.यावेळी अविनाश कदम, प्रमोद मलमे, संदीप पाटील, राजू सुके, प्रकाश हाणबर, अशपाक झालाईत, अभिनंदन सुंके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!